महाराष्ट्राची ‘लेडी सिंघम’ आहे मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी गेलेल्या टीमची प्रमुख

Maharashtra Lady Singham Sharda Raut to bring Mehul Choksi

नवी दिल्ली : मेहुल चोक्सीला (Mehul Choksi) भारतात परत आणण्यासाठी आठ अधिकाऱ्यांची टीम सध्या डॉमिनिकाला गेली आहे. बँकांच्या फ्रॉड प्रकरणांची चौकशी करणाऱ्या सीबीआयच्या प्रमुख शारदा राऊत (Sharda Raut) या टीमचे नेतृत्व करत आहेत. राऊत यांनीच पीएनबी घोटाळ्याच्या तपासाचे नेतृत्व केले होते. चोक्सी २०१८ पासून अँटिगामध्ये राहतो आहे. सध्या त्याला डॉमिनिकामध्ये ताब्यात घेण्यात आले आहे.

डॉमिनिकामध्ये गेलेल्या आठ सदस्यांच्या या टीममध्ये सीबीआय, ईडी आणि सीआरपीएफचे दोन दोन अधिकारी आहेत. सीबीआय प्रमुख शारदा राऊत या टीमच्या मुख्य सदस्य आहेत. त्यांनीच पंजाब नॅशनल बँक घोटाळा प्रकरणाच्या तपासाचे नेतृत्व केले होते.

शारदा राऊत यांचा जन्म महाराष्ट्राच्या नाशिकमध्ये झाला आहे. त्या २००५ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत. पालघरमध्ये एसपी असताना त्यांनी गुन्हेगारीवर दहशत निर्माण केली होती. नागपूर, मीरा रोड, नंदूरबार, कोल्हापूर, मुंबई आदी शहरांमध्ये त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यात मोठे योगदान दिले आहे.

एका वृत्तवाहिनीने म्हटले आहे की, ही टीम २८ मे रोजी डॉमिनिकामध्ये पोहचली आहे. उद्या मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणासंबंधीच्या सुनावणीमध्ये ही टीम वकिलांना मदत करणार आहे. ईडीची टीम उद्या तेथील न्यायालयात अॅफिडेव्हीट दाखल करणार आहे. यामध्ये मेहुल चोक्सी हा भारतीय नागरिक असल्याचे सांगितले जाईल. याचा अहवाल तयार असून आज केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर तो उद्या न्यायालयात सादर केला जाणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button