तू ‘हिंद केसरी’ चा किताब जिंकून आण; आम्ही महापालिकेच्या कुस्तीत विजय मिळवू – उद्धव ठाकरे

मुंबई : मुंबई : सलग तिसऱ्यांदा ‘महाराष्ट्र केसरी’ बनून या किताबावर सुवर्ण अक्षराने आपलं नाव कोरून हॅट्रिक पूर्ण करणारा जळगावचा मल्ल विजय चौधरी याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी जाऊन भेट घेली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी त्याच अभिनंदन केलं.

सोबतच फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या ‘ हिंद केसरी’ चा किताब जिंकून महाराष्ट्राची शान वाढवं, अश्या शुभेच्या ही दिल्यात. सोबतच तू ‘हिंद केसरीत विजय मिळवं, आम्ही महापालिकेच्या कुस्तीत विजय मिळवू, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

दीर्घकाळापासून सरकारी नौकरीची मागणी करत असल्याचं मल्ल विजय चौधरी यावेळी म्हणाला. त्यावर उद्धव ठाकरे म्हणालेत, मी आश्वासन तर देणार नाही पण नक्कीच यासाठी प्रयत्न करून ते करून दाखवणार.

यादरम्यान मल्ल विजय चौधरी याच्यासोबत त्याचे प्रशिक्षक अमोल बुचडे आणि राष्ट्रीय मल्ल भरत लिमाने हेही उपस्थित होते. आपण अथक परिश्रम करून, ‘हिंद केसरी’ हा ‘किताब नक्कीच जिंकू असा विश्वास मल्ल विजय चौधरी यांनी व्यक्त केलाय