सीमाप्रश्नी बुधवारी बैठक मुंबईत बैठक

मुंबई : महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नी (-Karnataka border) राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे. बुधवारी (ता. २७) मुंबईत विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नी या दोन राज्यांतील तणावाच्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या बैठकीकडे सिमवासीयांचे लक्ष आहे.

बैठकीसाठी सीमाभागाचे समन्वयक मंत्री छगन भुजबळ आणि एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, सतेज पाटील, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आदी नेते उपस्थित राहणार आहेत. यावेळी राज्याची भूमिका काय असावी, याबाबत विचारविनियम करण्यात येणार आहे. दोन्ही राज्यांत सीमेवरून वाद सुरू आहे व सध्या हे प्रकरण कोर्टात आहे. बेळगाव आणि सीमाभागासाठीची न्यायालयीन लढाई आपण नक्कीच जिंकू, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हुतात्मा दिनानिमित्त मांडली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER