सृष्टीच्या मूलभूत कणाच्या शोधातली महाराष्ट्र कन्या !

rohini Gadbole

डॉक्टर रोहिणी गोडबोले यांना 2019 चा पद्मश्री पुरस्कार तर मिळालाच ,पण भौतिक शास्त्रज्ञ म्हणून सगळ्यांना परिचयाच्या असणाऱ्या रोहिणी ताईंना नुकताच फ्रान्सच्या सरकारकडून दिला जाणारा नॅशनल ऑर्डर ऑफ मेरीट मानाचा किताब मिळाला. त्यांचा हा गौरव म्हणजे त्या मागील चाळीस वर्षे निष्ठेने आणि एकाग्रतेने करत असलेल्या संशोधनाचं फळ आहेच. परंतु याची दुसरी आणखीन एक बाजू म्हणजे भौतिकशास्त्रात त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या भारत-फ्रान्स च्या संयुक्त संशोधन प्रकल्पाचं हे फळ आहे. एकूणच थिओरेटीकल आणि पार्टिकल फिजिक्स मधलं काम कसं एकाग्रतेने प्रयत्नातून चालतं, याची कल्पना असेल तर त्याचे महत्त्व लक्षात येईल.

या विषयात गेली साठ-सत्तर वर्षे जागतिक स्तरावर भरपूर संशोधन झालं .अगदी साध्या आणि सोप्या भाषेत सृष्टीचे निसर्गाचे मूलभूत कण कोणते? हा या संशोधना मागचा हेतू ! मुळातच या विषयातले प्रयोग अतिशय दीर्घकालीन आणि अतिशय गुंतागुंतीचे म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यामुळे हे काम कोण्या एका संस्थेचे वा देशाचे नाही. तर अनेक देशांच्या या परस्पर सहकार्यातून जागतिक स्तरावर हे केले जाते. भारत आणि फ्रान्स या दोन देशातील विविध संस्था या विषयातील संशोधनासाठी एकत्र आल्या होत्या की ज्यात 50 च्या आसपास शास्त्रज्ञ काम करत होते आणि ह्या सगळ्यांचे नेतृत्व रोहिणी ताईंकडे होते. याशिवाय 5 वर्ष इंडो फ्रेंच सेंटर ऑफ ऍडव्हान्स सायंटिफिक रिसर्च या सल्लागार परिषदेच्या सदस्य होत्या. यासाठी त्यांचं कौतुक करण्यात आलं पण स्त्रियांचा विज्ञान संशोधनामध्ये सहभाग वाढावा यासाठी त्यांच्या असलेल्या प्रयत्नांचा खास उल्लेख करावा लागेल.

त्यांच्या कार्याच्या दरम्यान विज्ञान क्षेत्रातील स्त्रिया आणि त्यांचा सहभाग कसा वाढवावा याबद्दल भारत आणि फ्रान्स मध्ये जा बैठक दोन बैठका झाल्या त्यात रोहिणी यांना त्यांच्या विषयात काम करणाऱ्या स्त्रियांचे प्रश्न जवळून लक्षात आले. त्यातूनच त्यांनी भारत सरकारच्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी इनोव्हेशन पॉलिसी २०२० यात रोहिणी ताई यांनी महत्त्वाच्या सूचना केलेल्या आहेत.

डॉक्टर रोहिणी गोडबोले मूळच्या पुण्याच्या हुजूरपागा शाळेच्या विद्यार्थिनी. सतत हुशार म्हणूनच नावाजलेल्या सातवीत स्कॉलरशिपची परीक्षा दिली या परीक्षेची तयारी करताना त्यांना विज्ञानाची आवड निर्माण झाली. शाळेतून ती शिष्यवृत्ती मिळवणाऱ्या त्या पहिल्याच विद्यार्थिनी ठरल्या. त्यानंतरच्या गुणवत्ता यादीत पण त्या आल्यात. त्यावेळी त्यांनी पीएचडी करायचं निश्चित केलं. परंतु विषय गणित किंवा संस्कृत असेल असं त्यांना वाटलं होतं. पण मध्यंतरी मूलभूत विज्ञानाच्या प्रसारासाठी घेतल्या जाणाऱ्या एका शिष्यवृत्ती परीक्षेमुळे त्यांना आपल्याला विज्ञानात काहीतरी करायचं आहे हे समजलं. पुढे पदवी परीक्षेत सुवर्ण पदक आणि आयआयटीतून पदव्युत्तर पदवी घेतली रौप्यपदक मिळवलं.

आणि स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क मधून P h .D केलं. घरातून लग्नासाठी चर्चा सुरू झाली. पण तरीही दबाव आणला गेला नाही, प्रोत्साहन मिळालं, आणि कुठलीही आर्थिक जबाबदारी पण नव्हती. या तीन महत्त्वाच्या अनुकूल गोष्टींना ओळखून त्यांनी पूर्ण झोकुन देवून काम करायला सुरुवात केली. आणि हे यशाचा भरपूर माप त्यांच्या पदरात पडलं. बंगलुरूच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मधल्या सेंटर फोर हाय एनर्जी फिजिक्स. त्यात त्या कार्यरत आहेत.

ती त्यांची वाटचाल अभ्यासताना विज्ञान संशोधनामध्ये स्त्रिया मागे पडतात का ? आणि त्याविषयी कारणे काय असू शकतात? असा विषय मनात येतो. बर्‍याचशा क्षेत्रांमध्ये स्त्री संशोधकांची संख्या वाढत्या गतीने असली तरीही ती मोजता येण्यासारखी आहे. खाद्य विज्ञान, तंत्रज्ञान आणि सुरक्षा यासारख्या क्षेत्रातून काम करणाऱ्या डॉक्टर स्मिता लेले ,डॉक्टर दीपा भाजेकर, चिन्मयी देऊळगावकर,बालपणीचा मित्र चांदोबा ते भविष्यात प्रेरणा देणारा चंद्र ही वाटचाल यशस्वीपणे करणाऱ्या रितू क्रिधाल, वनिता मुथय्या, इस्त्रोच्या पन्नास वर्षांच्या इतिहासातील दोन स्त्रिया चांद्रयान 2 ची मोहीमीचे नेतृत्व करणाऱ्या, अशा असामान्य स्त्रियांचा समावेश असला तरीही ही संख्या समाधान कारक नाही. कारण तिच्या बुद्धिमत्ता बद्दल आता शंका उरली नाही.

परंतु काही काही क्षेत्र अजूनही स्त्रियांसाठी विचारात घेतली जातात, अलिखित पणे ! सर्वसामान्यपणे लेक्चररशिप, टीचर बँक अशा कामांना प्राधान्य दिले जाते .आज परिस्थिती बदलली असली तरीही ! कारण हे काही जॉब मुलींच्या बाबतीत त्यातल्या त्यात सुरक्षित आणि वेळेची मर्यादा असणारे आणि विशेष म्हणजे “सगळं सांभाळून करण्यासारखे “असे समजले जातात आणि हीच खरी अडचण आहे.

यामध्ये काही भाग नैसर्गिकरीत्या स्त्रीवर येणार्‍या जबाबदाऱ्यांचा लक्षात घ्यावा लागतोच ! मुलांना जन्म देण्याची आणि मातृत्व म्हणून जी काही जबाबदारी असते ती असतेच .आणि ती वेळात पार पाडणे गरजेचे असते. तिच्या, व बाळाच्या दृष्टीनेही ! योग्य वयात जर हे निर्णय घेतले तर तिच्यासाठी ते सोपे आणि सहज ठरतात. एक विशिष्ट काळतरी देणे यावेळी गरजेची असते. म्हणून विवाह व अपत्य यासाठी मुलींवर दबाव येत असतो ,कुटुंबीयांकडून व समाजाकडूनही .अर्थात त्यांच्या भल्यासाठी. पण अडचण अशी की विज्ञानाची वेगवान घोडदौड थांबत नसते .दिवसाला नवीन काहीतरी संशोधन होणार असतं आणि नवीन तंत्रज्ञान येणार असतं हा महत्त्वाचा काळ जर कौटुंबिक कारणांसाठी खर्च केला तर त्या तरुणींच्या मार्गात अनेक अडचणी अडथळे येतात आणि त्यांची वाट खूपच कठीण होत जाते.

याबाबतीत एके ठिकाणी स्वतः ह् रोहिणी ताई म्हणतात , “महिलांना घरच्यांच्या आणि समाजाच्या दबावाला फक्त सामना नाही करावा लागत तर ,विज्ञान क्षेत्रातील पॅशन असण्याची गरज, उत्कटनेने मेहनत घेण्याची, स्त्रियांमध्ये नसते असा सार्वत्रिक समज असतो त्याचा प्रत्यय स्त्रियांना कामादरम्यान वारंवार येतो .म्हणजे पदवी मिळवलेली असूनही या क्षेत्रात आपण स्वतंत्रपणे उभे राहू शकू का? विज्ञानातील नवे प्रश्न विचारू शकू का? ते आपल्याला जमेल का याबाबतचा आत्मविश्वास कमी पडतो.” आणि ही स्वतःची ओळख मिळवताना घरच्या मंडळींकडून आणि योग्य मार्गदर्शक आवश्यक असतं. त्यासाठी त्यांनी काही सूचना केल्या आहेत ,की स्त्री संशोधकांच्या मुलांसाठी पाळणाघराची सोय करायला हवी .आणि पीएचडी पूर्ण केल्यावर फॅकल्टी पोझिशन मिळवण्यासाठीच या योजनांना वयाची मर्यादा असते ती थोडीशी शिथिल करावी कारण घरगुती कारणांमुळे स्त्रियांना ब्रेक घ्यावा लागतो त्याच्यासाठी त्यांचं वय लक्षात न घेता त्यांचा अकॅडमी एज लक्षात घ्यावा.

मुळात याबाबतीत मुलींना वाढवताना सुद्धा त्यांना विज्ञानात निर्माण होणारी रुची निर्माण होईल, त्या दिशेने त्या चिकाटीने काम करतील असा प्रयत्न करता येईल, किंवा त्यांच्या संशोधनाच्या रस्त्यामध्ये ज्याही काही अडचणी येतील, त्यासाठी आम्ही पाठीशी आहोत ही भूमिका कुटुंबियांनी जर घेतली तर घर, संसार आणि मुलं हे सांभाळून संशोधन शक्य आहे हा आत्मविश्वास मुलींमध्ये निर्माण होईल. त्यासाठी दृष्टिकोन व्यापक करण्याला पर्याय नाही, नाहीतर कायम स्वरूपी सुरक्षित आणि वेळेचे मर्यादा असणारे चाकोरीबद्ध जॉब,करून यशाची भरारी घेण्याची मुलींची स्वप्न अपुरी राहतील. कुटुंब संस्था ,घरातील वडीलधारी लोकांची मदत नाकारून, मुलच नको हा पर्याय याच्यासाठी समर्थनीय नाही. ही एक सृजनशील गरज आहे. तिचा आनंद वेगळा आहे. आणि म्हणूनच कुटुंब संस्था ही एक सपोर्ट सिस्टिम म्हणूनच निर्माण व्हायला हवी आणि मानायला हवी,कारण हा आपल्या देशाचा प्लस पॉइंट आहे, असं मला वाटतं !

मानसी गिरीश फडके.
समुपदेशन व सायकोथेरपिस्ट.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER