मुंबई-पुण्याबाहेरही महाराष्ट्र आहे, तिकडेही लक्ष द्या ; ‘हा’ राज्य सरकारचा नाकर्तेपणा : देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना टोला

Devendra Fadnavis & Uddhav Thackeray

मुंबई : राज्यात कोरोनाचे (Corona) सनकोट वाढतच चालले आहे . मुंबई आणि पुणे ही राज्यातील महत्त्वाची शहरे आहेत, ही बाब मान्य आहे. मात्र, या दोन शहरांपलीकडेही महाराष्ट्र आहे, हे सरकारच्या लक्षातच आलेले नाही, अशी टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली. सरकारच्या या धोरणामुळेच नागपूर, नाशिक आणि औरंगाबादसारख्या शहरांमध्ये आरोग्य व्यवस्था अजूनही वाढवलेल्या नाहीत. त्यामुळे आता मी नागपूरमध्येच थांबून या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. ते बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्यातील बेड, व्हेंटिलेटर्स आणि इतर आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी आणखी किती कालावधी लागणार, यावर मुख्यमंत्री काहीच बोलले नाहीत, याकडे फडणवीसांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

याशिवाय, ऑक्सिजनची कमतरता हा सरकारचा नाकर्तेपणा आहे. राज्य सरकारला ऑक्सिजनच्या वाहतुकीचे व्यवस्थापन जमत नाही. त्यामुळे राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.

लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी घोषित करण्यात आलेले 5300 कोटींचे पॅकेज ही निव्वळ धुळफेक आहे. यापैकी 3300 कोटींची तरतूद अर्थसंकल्पात वर्षभराच्या कालावधीतील खर्चासाठी केली होती. त्यामुळे सरकार कोणतीही अतिरिक्त मदत देणार नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.

तसेच ज्येष्ठ नागरिक आणि निराधार महिलांना 1500 रुपयांची आर्थिक मदत या केंद्र सरकारच्या योजना आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यामध्ये कोणतीही भर घातलेली नाही. केवळ ते पैसे आगाऊ मिळणार आहेत. त्यामध्ये काही विशेष नाही, असे फडणवीस यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button