बारावीचा निकाल जाहीर ; यंदाही मुलींचीच बाजी

maharashtra 12th-result-announce

मुंबई :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे महाराष्ट्र बोर्ड बारावीच्या परीक्षेचा निकाल (Maharashtra HSC Result )जाहीर झाला आहे. राज्याचा निकाल ९०.६६ टक्के (90.66%)लागला असून यंदा कोकण विभागाने बाजी मारली आहे. तसेच दरवर्षी प्रमाणे यंदाही मुलींचाच बोलबाला पाहायला मिळाला.

मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर बारावीचा निकाल पाहता येणार आहे. यंदाच्या वर्षी बारावीच्या परीक्षेसाठी १५ लाख ५ हजार २७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १३ हजारांनी अधिक आहे. १८ फेब्रुवारी ते १८ मार्च या कालावधीत राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई (Mumbai), कोल्हापूर (Kolhapur), अमरावती (Amravati), नाशिक (Nashik), लातूर (Latur) आणि कोकण (Konkan) या नऊ मंडळांमार्फत परीक्षा घेण्यात आली.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा शकुंतला काळे (Shakuntala Kale) यांनी निकाल जाहिर केला. यामध्ये सर्वाधिक निकाल कोकण विभागाचा लागला आहे. कोणक विभागाचा निकाल ९५.८९ टक्के लागला आहे. तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी ८८.१८ टक्के लागला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER