शरद पवार हे सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करतील? भाजपच्या टीकेला गृहमंत्र्यांचे प्रत्युत्तर

Sharad Pawar-Supriya Sule-Anil Deshmukh

मुंबई : वेळ आल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) पुतण्याला नव्हे, सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करतील, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना लगावला होता.

त्यावर  राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी पलटवार केला आहे. चंद्रकांत पाटील यांची राजकीय उंची काय? काही कर्तृत्व  नसताना, उंची नसताना ते हे बोलतात. त्यांनी आपली उंची काय ते आधी पाहावं. हे सर्वांनाच माहिती आहे.

ते मोठ्या मोठ्या नेत्यांबाबत असंच काही बोलून आपली उंची वाढवत राहतात, असा टोला देशमुख यांनी लगावला आहे .कोरोना आणि विविध आघाड्यांवर आमच्या सरकारनं चांगलं काम केलं आहे. हीच आमची अचिव्हमेंट आहे. आमचे सरकार पाच वर्षे चालेल. विरोधकांनी मुंगेरीलालचे स्वप्न पाहाहत राहावं, अशा शब्दांत त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER