कोरोना : विलग रुग्णाने नियमाचा भंग केल्यास कलम १८८ अंतर्गत कारवाई

मुंबई : कोरोना व्हायरसच्या अनुषंगाने रुग्णाला सांगण्यात आलेला आवश्यक विलगीकरणाचा नियमभंग केला तर त्याच्याविरुद्ध कलम १८८ अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र सरकारने म्हटले आहे.

कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. तथापि, महाराष्ट्रात त्याआधीच घराबाहेर निघण्यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे.

या आदेशात म्हटले आहे की, लॉकडाऊनच्या काळात लोकांनी केवळ अत्यावश्यक असलेल्या कामासाठीच बाहेर पडण्याची सक्ती आहे. तीसुद्धा सोशल डिस्टंसिंग ठेवूनच. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा अखंडित सुरू राहावा यासाठी पावले उचलण्यात येतील, असेही यात म्हटले आहे. ज्यांना आरोग्य अधिका-यांनी किंवा कर्मचा-यांनी सक्तीने घरी किंवा इस्पितळात विलग होण्यास सांगितले आहे, अशांनी जर आदेशाचे पालन केले नाही तर त्यांच्यावर भारतीय दंड विधान संहितेच्या कलम १८८ अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याचे या आदेशात म्हटले आहे.

कलम १८८ मधील तरतुदीनुसार नियमाचा भंग करणा-याला एक महिन्याचा तुरुंगवास किंवा २०० रुपये दंड किंवा दोन्ही, असे शिक्षेचे स्वरूप आहे. जर नियमांची अवज्ञा केल्याने मानवी जीवन, आरोग्य किंवा सुरक्षा धोक्यात येऊ शकते. यासाठी सहा महिन्यांचा तुरुंगवास आणि एक हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद आहे.


Web Title : Maharashtra govt warns of action under ipc for violating quarantine

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)