राज ठाकरेंनी आयोजित केलेल्या मायकल जॅक्सनच्या कॉन्सर्टला ठाकरे सरकारची करमाफी?

raj thackeray and uddhav thackeray

मुंबई : महारष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या पुढाकाराने मुंबईत 1996 साली आयोजित करण्यात आलेल्या मायकल जॅक्सन (Michael Jackson) याच्या कार्यक्रमावरील करमणूक कर माफ करण्याचा निर्णय कायम ठेवण्याचे ठाकरे सरकारने निश्चित केले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी होणाऱ्या बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल.

महाविकासआघाडी सरकारच्या (Mahavikas Aghadi) मंत्रिमंडळाने आज करमाफीचा निर्णय घेतल्यास या कॉन्सर्टची व्यवस्थापक असणाऱ्या Wizcraft International कंपनीला तिकीट विक्रीतून मिळालेली 3.36 कोटी रुपयांचे रक्कम परत मिळेल. ही रक्कम सध्या न्यायालयाच्या अखत्यारित असणाऱ्या ट्रेझरी विभागाकडे आहे.

1996 मध्ये शिवसेना-भाजपच्या (Shiv Sena-BJP) तत्कालीन सरकारने करमाफीचा निर्णय घेतला होता. तेव्हा उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तत्कालीन सरकारला फटकारले होते. डोक्याचा वापर न करता हा निर्णय घेतल्याचे खडे बोल न्यायालयाने युती सरकारला सुनावले होते. तसेच न्यायालयाने या आदेशाला स्थगिती देत हा प्रस्ताव पुन्हा राज्य सरकारकडे पाठवला होता. गेल्या 24 वर्षांपासून या मुद्दा न्यायप्रविष्ट आहे .

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER