ठाकरे सरकारला मोठा धक्का; ‘ही’ शिफारस राज्यपालांनी केली अमान्य

CM Uddhav Thackeray-Governor Koshyari

मुंबई : राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला मोठा धक्का बसला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारचा एक महत्त्वाचा आदेश फेटाळून लावल्याची माहिती समोर येत आहे.

राज्य सरकारने थेट सरपंच निवडीला विरोध केला होता. हा नियम बदलण्यासाठी नवा अध्यादेश करावा असं सरकारचं मत होतं. मात्र सरकारची ही शिफारस राज्यपालांनी मान्य केली नसल्याने महाविकास आघाडीच्या पदरी निराशाच पडली आहे .

मंत्रालयातील अत्यंत महत्वाच्या पाच सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

 त्यामुळे सरकारला आता विधानसभेत यासंबंधीचं विधेयक आधी मंजूर करून घ्यावं लागणार आहे. दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात लोकांमधून थेट सरपंच निवडीचा कायदा करण्यात आला होता. विविध तज्ज्ञांचा समावेश असलेल्या एका समितीने अशा प्रकारची शिफारस केली होती. त्याला फडणवीस सरकारनं लागू केलं होतं. मात्र या कायद्यामुळे ग्रामपंचायत स्तरावर वाद निर्माण झाले होते. ग्रामपंचायत सदस्य एका पक्षाचे आणि सरपंच एका पक्षाचा असे प्रकार घडल्याने कामकाजात अडथळे येत आहेत अशी टीका होऊ लागली होती.

राष्ट्रवादीचा या कायद्याला विरोध होता. त्यामुळे महाविकास आघाडीने तो आदेश रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र राज्यपालांनी नवा अध्यादेश काढण्यास नकार दिल्याने राज्य सरकारला तोंडघशी पडले आहे .