राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना हटकले; विद्यापिठांच्या अंतिम वर्षांच्या परिक्षेबाबतचा गुंता त्वरित सोडवण्याची केली सुचना

Bhagat Singh Koshyari-Uddhav Thackeray

मुंबई: ऐन परिक्षेच्या काळातच भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्याने शाळा, महविद्यालयांच्या परिक्षांवर याचा मोठा परिणाम झाला. त्यातच शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या काही निर्णयानंतर विद्यापिठांच्या परिक्षांसदंर्भात विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. विशेषतः अंतिम वर्षांच्या परिक्षांसदर्भात राज्यात गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.

त्यामुळे आता या प्रकरणात थेट राज्यपालंनीच हस्तक्षेप केला असून याबद्दल राज्यपाल कोश्यारी यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हटकले आहे. विद्यापिठांच्या अंतिम वर्षांच्या परिक्षेबाबतचा गुंता त्वरित सोडवावा अशा सुचना राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना केल्या आहेत.

तसेच, विद्यापिठांच्या परिक्षा न घेणे हा युजीसीच्या दिशानिर्देशांचा अपमान करणे होय असेही कोश्यारी यांनी म्हटले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी यात हस्तक्षेप करून हा मुद्दा त्वरित निकालात काढावा असे राज्यापालांनी म्हटले आहे.

विद्यापिठांच्या अंतिम वर्षांच्या परिक्षा रद्द करण्यासाठी शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी युजीसाला पत्र लिहीले आहे. यावर राज्यपाल कोश्यारी यांनी आक्षेप घेतला असून यासाठी राज्यपालांनी मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र लिहून बजावले आहे.

स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी असे अतार्किक निर्णय घेण्या-या मंत्र्यांना मुख्यमंत्र्य़ांनीच तंबी द्यावी असेही राज्यपाल कोश्यारी यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच, युजीसीच्या दिशानिर्देशांचे अवमान होणार नाही याची खबरदारी मुख्यमंत्री ठाकरेंनी घ्यावी असेही पत्रात नमूद आहे.

तसेच, हा युजीसीच्य़ा दिशानिर्देशांचाच अवमान नाही तर महाराष्ट्र राजकीय विश्वविद्यालय अधिनियम-2016 च्या नियमांचेही उल्लंघन ठरेल. असे राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे.दरम्यान, मुख्यमंत्री ठाकरे यावर काय निर्णय घेतात याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

Check PDF:-युजीसीच्या दिशानिर्देश


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER