काळी टोपी घालून राजभवनात बसून राज्यपालांना शेतकऱ्यांचं दु:ख कळणार नाही – राजू शेट्टी

Raju shetti-Governor

मुंबई : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर शेतकरी मदतीविना पोरके झाल्याची भावना व्यक्त होत होती. त्यातच आता शेतक-यांना दिलासा देण्यासाठी राज्यपाल कोश्यारी यांनी  मदत जाहीर केली आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत जाहीर केली आहे.

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये खरीप पिकाचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजार रुपयांची तर फळबागांसाठी हेक्टरी १८ हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. दोन हेक्टरपर्यंत शेती असलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळणार आहे.

राज्यात भाजपचंच सरकार येईल; फडणवीस यांचा शब्द- चंद्रकांत पाटील

याशिवाय परीक्षा शुल्क आणि शेतसारा माफ करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. कृषी खरीप पिकांसाठी दोन  हेक्टरपर्यंत प्रतिहेक्टर आठ हजार रुपये आणि फलोत्पादन / बारमाही पिकांसाठी दोन  हेक्टरपर्यंत प्रतिहेक्टर १८ हजार रुपयांची मदत मिळणार आहे. राज्यपालांनी तातडीने मदत वाटप करण्याचे आदेश राज्य प्रशासनाला दिले आहेत.

दरम्यान, हेक्टरी 8 हजार म्हणजे एकरी 3 हजार ते 3200 रुपयेच मदत मिळणार आहे. मात्र शेतक-यांना मिळणारी ही मदत नुकसानीच्या तुलनेत अत्यंत तोकडी असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे तसेच शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याने विरोधकांनी त्यावर टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, हेक्टरी आठ हजार म्हणजे एकरी ३ हजार ते ३२०० रुपयेच मदत मिळणार आहे. मात्र शेतक-यांना मिळणारी ही मदत नुकसानीच्या तुलनेत अत्यंत तोकडी असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.  तसेच शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याने विरोधकांनी त्यावर टीकास्त्र सोडलं आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारच्या या मदतीवर जोरदार टीका केली आहे. शेट्टी म्हणाले, राज्यपालांनी बाहेर पडून नुकसानीची पाहणी करावी. ही मदत म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा आहे. काळी टोपी घालून राजभवनात बसून शेतकऱ्यांचं दु:ख त्यांना कळणार नाही, अशी घणाघाती टीका राजू शेट्टी यांनी केली. ही एवढीशी मदत शेतकऱ्यांची थट्टा करणारी आहे. जो नियम महापूरग्रस्तांसाठी लावण्यात आला आहे तोच अवकाळी पावसासाठी लावणे गरजेचे आहे.

राज्यपाल कधीही राजभवनाबाहेर पडले नाहीत. शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाहीत. त्यांना शेतकऱ्यांचे दु:ख माहीत नाही. खरं तर त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन एकदा बघावं, शेतकऱ्यांच्या व्यथा-वेदना समजून घ्याव्यात आणि ही तुटपुंजी मदत जाहीर करताना १० वेळा विचार करावा, असं राजू शेट्टी म्हणाले.

आमचं दुर्दैव आहे की, अशा प्रकारचे राज्यकर्ते आमच्या नशिबी आले आहेत. म्हणून शेतकरी आत्महत्या वाढत आहे. हा निधी तुटपुंजा आहे. राज्यातील ७० लाख शेतकरी बाधित आहेत. माझा आकाडा यापेक्षा जास्त आहे. एवढ्या १० हजार कोटींनी काय होणार आहे? असा प्रश्नदेखील त्यांनी केला आहे.