राज्यपालांकडून शेतकऱ्यांना आठ हजार रुपये प्रतिहेक्टरी मदत जाहीर

maharashtra governor-Bhagat Singh Koshari-farmers

मुंबई :- महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवटीदरम्यान शेतक-यांना तातडीची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. खरिपासाठी दरहेक्टरी आठ  हजार रुपये तर दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेल्या शेतक-यांना खरीप पिकांसाठीही नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. राजपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या आदेशानुसार नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे.

फळबागा आणि बागायतीसाठी १८ हजार रुपये प्रतिहेक्टरी मदत देण्यात येणार असल्याचे राजभवनाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे. राज्यपालांच्या या निर्णयामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

अवकाळी पाऊस आणि त्यामुळे राज्यातील पिकांचं झालेलं नुकसान यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मुलांची शाळा आणि कॉलेजची परीक्षा फी माफ करण्यात येईल, असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे. पावसाळ्यात नेमका पाऊस झाला नाही.  त्यामुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ आली. तर आता काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बीचे पीकही धोक्यात आले.

एकीकडे शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत तर मजुरांना देण्यासाठीही आता पैसे उरले नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाला आहे.  अवकाळी पावसामुळे राज्यातील  शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं.

अवकाळी पावसाचा द्राक्षबागांना मोठा फटका बसला. सांगली जिल्ह्यातील शेतकरी यामुळं अक्षरश: देशोधडीला लागले.

शेतकऱ्यांवर हजारो किलोंची द्राक्ष फेकून देण्याची वेळ आली आहे. तर प्रशासनाने तातडीनं मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात होती.

शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या; महाआघाडीचे नेते राज्यपालांना भेटणार