आता शिक्षणाचा ‘विनोद’ होऊ देणार नाही- जयंत पाटील

jayant-Patil -ashish shelar

मुंबई : पाच वर्षे शिक्षणाचा विनोद झाला. आता शिक्षणाचा विनोद होऊ देणार नाही, शिक्षणाला किमान समान कार्यक्रमात महत्त्वाचं स्थान देणार असल्याचं राष्ट्रवादी नेते जयंत पाटील म्हणाले आहेत. ते महाराष्ट्र विकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत बोलत होते. शिक्षणाला किमान समान कार्यक्रमात महत्त्वाचे स्थान दिले जाईल असे त्यांनी सांगितले. तसंच, सध्याच्या परिस्थितीत आशिषचं समाधान आम्ही करू शकत नाही.

मात्र ज्यांच्याकडे आशिष नाही त्यांच्याकडे आशिष पाठवण्याची व्यवस्था आम्ही नक्की करू, असा टोला त्यांनी आशिष शेलार यांना लगावला आहे. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस हे तिन्ही पक्ष एकत्र येत ‘महाराष्ट्र विकास आघाडी’चे सरकार स्थापन करत आहेत. त्या अंतर्गत ‘महाराष्ट्र विकास आघाडी’ने आपला किमान समान कार्यक्रम जाहीर केला आहे.

हिवाळी अधिवेशनानंतर राज्याला ‘उपमुख्यमंत्री’ : प्रफुल्ल पटेल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, नवाब मलिक आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन किमान समान कार्यक्रम काय आहे, याची माहिती दिली. शिवसेनेच्या जाहीरनाम्यातील १० रुपयांची थाळी आणि एक रुपयात क्लिनिक हेही आश्वासन पूर्ण करण्यात येणार असल्याचं स्पष्ट केलं. शेतकऱ्यांची कर्जमाफी, तत्काळ मदत आणि पीक विमा या कार्यक्रमाला प्राधान्य देण्यात आलं. शेतकऱ्यांच्या उत्पादित मालाला योग्य भाव मिळावा, यासाठीही या कार्यक्रमात घोषणा करण्यात आली आहे.