मराठा आरक्षणासाठी तातडीने घटनापीठ नेमा; राज्य सरकारची मुख्य न्यायमूर्तींकडे मागणी

CM Thackeray-SC

मुंबई : राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी (Maratha Resrvation) सर्वोच्च न्यायालयाला पत्र पाठवले आहे. मराठा आरक्षणासाठी तातडीने घटनापीठ नेमण्याची मागणी या पत्राच्या माध्यमातून केली गेली आहे. त्याचबरोबर मराठा आरक्षणावरील अंतरिम आदेश रद्द करण्याच्या अर्जावर सुनावणी करण्याची मागणीदेखील राज्य सरकारने पत्राद्वारे मुख्य न्यायमूर्तींकडे केली आहे.

राज्य सरकारने याआधी ७ ऑक्टोबरलादेखील मुख्य न्यायमूर्तींना पत्र पाठवले होते. दरम्यान, काल (२७ ऑक्टोबर) सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण प्रकरणावर सुनावणी झाली. या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने ही सुनावणी चार आठवडे पुढे ढकलली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER