उद्याच बहुमत सिद्ध करा – सर्वोच्च न्यायालय

बहुमत सिद्ध करण्यासाठी फडणवीस सरकारकडे 30 तास

CM Fadnavis-Sharad Pawar.jpg

मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेबाबतचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. उद्याच बहुमत चाचणी सिद्ध करा, असे कोर्टाने सांगितले आहे. तसेच बहुमत चाचणीसाठी गुप्त मतदान नाही तर मतदानाचे ‘लाईव्ह टेलिकास्ट’ करा, असे सुप्रीम कोर्टाने सुनावले आहे.

त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बहुमत सिद्ध करण्यासाठी उद्या संध्याकाळी ५ वाजतापर्यंतची वेळ आहे. सुप्रीम कोर्टाने उद्या २७ नोव्हेंबरला बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे उद्या फडणवीस सरकारला आपलं बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीनंतर, तत्काळ बहुमत चाचणी घेण्याची मागणी शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीने सुप्रीम कोर्टात केली आहे.

त्याबाबत रविवार आणि सोमवार असे दोन्ही दिवस दोन्ही बाजूंनी युक्तिवाद झाला. शिवसेनेतर्फे कपिल सिब्बल, काँग्रेस-राष्ट्रवादीतर्फे अभिषेक मनू सिंघवी, अजित पवार यांच्यातर्फे मणिंदर सिंग, भाजपतर्फे मुकुल रोहतगी आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सुप्रीम कोर्टात आपापली बाजू मांडली.

विधानसभा अध्यक्षपदासाठी ६ आमदारांच्या नावांची शिफारस !