तीन दिवसीय जीएसटी विधेयक अधिवेशन २० मे पासून

Sudhir Mungattiwar

मुंबई: वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीसाठी राज्य सरकारने विशेष अधिवेशनाचे १७ मे रोजी आयोजित केले होते. आता अधिवेशनाच्या तारखेत बदल करण्यात आले आहे. जीएसटी विधेयक अधिवेशन 17 मे ऐवजी 20, 21, 22 मे रोजी होणार आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला . अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबतची माहिती दिली. 18 आणि 19 मे रोजी श्रीनगर इथं अर्थमंत्र्यांनी जीएसटी कौन्सिलची बैठक आयोजित केली आहे.

कोणत्या वस्तू कर रचनेत येतील याचा निर्णय या बैठकीत होईल. राज्याचा अर्थ मंत्री म्हणून उपस्थित राहणं महत्वाचं आहे, असे मुनगंटीवार म्हणाले. दरम्यान, गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक घेऊन निर्णय जाहीर करु. या निर्णयात गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची सरकारने तयारी दर्शविली आहे. यंदाही सरकार शेतकऱ्यांना भरपाई देण्यास तयार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली .