सुवर्णपदक विजेत्या मुष्टियोद्ध्याची आत्महत्या

maharashtra-gold-medalist-boxer-pranav-raut-commits-suicide

अकोला :- मुष्टियुद्धातील महाराष्ट्राचा सुवर्णपदक विजेता प्रणव राऊत (२२) याने आत्महत्या केली. शास्त्री स्टेडियम जवळील ‘क्रीडा प्रबोधनी’मध्ये त्याने गळफास लावून घेतला. नुकत्याच दिल्लीत झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत प्रणवने सुवर्णपद जिंकले आहे. त्याच्या आत्महत्येमागचे कारण कळले नाही.

ही बातमी पण वाचा : कोल्हापूर : आत्महत्या केलेल्या मुलीच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट

शुक्रवारी (२१ फेब्रुवारीला) सकाळी साडे नऊच्या सुमारास प्रणवने आत्महत्याचे लक्षात आले. तो स्टेडियममधील खोलीतून बाहेर आला नाही. त्याच्या मित्रांनी दरवाजा ठोठावला; दरवाजा आतून बंद होता. दरवाजा उघडला जात नसल्याने त्याच्या मित्रांनी दरवाजा तोडला. खोलीत प्रणवने गळफास लावून घेतल्याचे दिसले.

प्रणवच्या वागण्यात कालपर्यंत काहीही वेगळेपणा जाणवत नव्हता, असे त्याच्या मित्रांनी सांगितले. त्याच्या वागण्यातून किंवा बोलण्यातून तो कोणत्याही तणावात किंवा दबावात असल्याचे जाणवत नव्हते, असे त्याच्या प्रशिक्षकांनीही सांगितले. त्यामुळे साऱ्यांनाच धक्का बसला आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.