महाराष्ट्र गारठला ; थंडीची लाट

Rise in cold in Maharashtra

मुंबई : देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील थंडीचा कडाका कायम आहे. दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील थंडीचा कडाका वाढला आहे. उत्तर भारतातील थंडीची लाट आली आहे. याचे परिणाम म्हणून महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत कडाक्याची थंडी पडली आहे. परभणीतील तापमानाचा पारा ५.६ अंश सेल्सियस पर्यंत खाली आला असल्याची माहिती हवामान विभागाकडून मिळाली आहे.

सध्या उत्तर प्रदेशच्या पूर्व भाग, बिहार, पश्चिम बंगाल आणि ओडिशातील काही भागांत थंडीची लाट पसरली आहे. पुढील दोन दिवस या ठिकाणी थंडीची लाट राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

जम्मू- काश्मीर आणि हिमाचल प्रदेशातील बहुतांश भागात तापमानाचा पारा शुन्याच्या खाली घसरला आहे. दिल्लीतील तापमान ३.४ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. बर्फाच्छादित पश्चिम हिमालयीन क्षेत्रातून थंड वारे वहात आहे. यामुळे थंडीची लाट पसरली आहे.

गेल्या दोन दिवसांत हवामान विभागाने नोंदविलेले तापमान (अंश सेल्सिअस) : मुंबई (कुलाबा) २१.८, रत्नागिरी २२.४, पणजी (गोवा) २०.३, जळगाव १२, कोल्हापूर १७.१, महाबळेश्वर १२.१, नाशिक १२.२, सांगली १६.५, सोलापूर १५.५, औरंगाबाद १२.४, अकोला १२.६, बुलढाणा १३.८, गोंदिया ७.४.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER