तीन नेत्यांच्या हातात महाराष्ट्राच्या सत्तेच भवितव्य

Sharad Pawar Uddhav Thackeray And Sonia Gandhi

मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांचे विचार संपूण देशात मानले जात असून ते प्रेरणादायक असल्याचे सांगत माजी मंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीवर त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि सोनिया गांधी हे महाराष्ट्रातल्या सत्तास्थापनेचा निर्णय घेतील असा खुलासाही त्यांनी केला. लवकरच याबाबत चित्र स्पष्ट होईल असेही ते म्हणाले.

‘अजून काहीही ठरलेले नाही’-अजित पवारांच्या वक्तव्याने शिवसेनेच्या चिंतेत वाढ

भाजपने सत्ता स्थापनेस नकार दिल्यानंतर राज्यपालांनी दिलेलेल्या वेळेत शिवसेनेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची पत्र देता आली नव्हती. त्यामुळे राजभवनातून सर्व नेत्यांना रिकाम्या हातांनी परत यावे लागले होते. ठाण्याहून शेकडो शिवसैनिकांसह माजी मंत्री एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस अभिवादन करण्याकरता रेल्वे ने प्रवास केला. ठाण्यातून शिवसैनिकांसह ते दादरला पोहोचले आणि शिवाजी पार्क इथल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीवर त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नुसत्या चर्चाच सुरू असून त्यातून काहीही ठोस निघत नसल्याचे स्पष्ट होत आहे. संसदेचं हिवाळी अधिवेशन सोमवार 18 नोव्हेंबरपासून सुरू होतेय. त्या दरम्यान 19 तारखेला शरद पवार आणि सोनिया गांधी यांची भेट होणार आहे. त्या भेटीत निर्णय होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.