काही विषयात राजकारण करता कामा नये, महाराष्ट्राच्या निवडणुकीला अजून 4 वर्ष आहेत – बाळासाहेब थोरात

Balasaheb Thorat.jpg

मुंबई: “राज्यातील सध्याचे वातावरण पाहता महाराष्ट्राला आणि आघाडी सरकारला कसं बदनाम करता येईल, याचेच मनसूबे रचले जात आहेत. याला महाराष्ट्राने तोंड दिलं पाहिजे. काही विषयात राजकारण करता कामा नये. अजून निवडणुकीला 4 वर्ष आहेत”, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी भाजपवर (BJP) निशाणा साधला आहे.

मराठा आरक्षण प्रकरणी काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी बैठक घेतली. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास दिलेली अंतरिम स्थगिती उठविण्यासाठी एकजुटीने आणि विरोधी पक्षासह, विविध संस्था, संघटना तसेच विधीज्ज्ञ अशा घटकांशी समन्वय साधून प्रयत्न करु, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

“सर्वांना एकत्र घेऊन याबाबत पुढे जायचं आहे. मुख्यमंत्री विरोधी पक्षांशी बोलले आहेत. न्यायालयात कशा प्रकारे जायचं”, याबाबत रणनिती आखण्यात येत असल्याची माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली.

ते म्हणाले, “श्रीहरी अणेंना काय घाई झाली आहे, मला माहित नाही. राज्य सरकार सर्व पर्यायांवर विचार करत आहे.
तसेच, “विधानपरीषदेच्या 12 जागांची नावं आम्ही लवकरच पाठवू. पण राज्यपालांनीही ती नावं लगेच मंजूर करावी”, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले.

तर, मराठा आरक्षणावर बोलताना आरक्षणाला स्थगिती देणे सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय अनाकलनीय अशी प्रतिक्रिया थोरात यांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER