बाळासाहेबांनी ज्या लुंगीला केला विरोध; तीच लुंगी नेसून आदित्य ठाकरेंचा प्रचार!

Aaditya Thackeray

मुंबई :- शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे हे वरळी विधानसभा मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणूक लढणार आहेत. पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबातील एखादी व्यक्ती निवडणूक लढवत असल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वरळी मतदारसंघाकडे लागले आहे. सर्वांच्या अपेक्षा पाहता आदित्य ठाकरेही प्रचारात मेहनत घेत आहेत.

शिवसेनेचे संस्थापक अध्यक्ष हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ‘बजाव पुंगी, भगाव लुंगी’ असा नारा दाक्षिणात्यांविरुद्ध दिला होता. मात्र, याला बगल देत आता दाक्षिणात्यांचीही मते शिवसेनेला गरजेची वाटू लागली आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरे स्वत: लुंगी नेसून मुंबईत असलेल्या दाक्षिणात्यांची मते मागताना दिसत आहेत.

ही बातमी पण वाचा : ‘जर आज बाळासाहेब किंवा मी असतो तर, शिवसेनेवर ही वेळ आली नसती’, राज ठाकरेंचा उद्धवला टोला

गेल्या काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांच्या प्रचारार्थ वरळी मतदारसंघात लागलेल्या ‘केम छो वरली’ अशा गुजराती भाषेतील बॅनर्सची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती. फक्त गुजरातीच नव्हे तर मराठीव्यतिरिक्त इंग्रजी, उर्दू आणि तेलुगूतील बॅनर्ससुद्धा आदित्य ठाकरे यांच्या प्रचारार्थ लावण्यात आले होते.

मराठी माणूस आणि मराठी भाषेचा मुद्दा घेऊन स्थापन झालेल्या शिवसेनेने आधी हिंदी आणि गुजरातीसह इतर भाषांमधून प्रचार करायला सुरुवात केल्यानंतर राजकीय वर्तुळात उलट सुरुवात चर्चा सुरु आहे . दरम्यान वरळी मतदारसंघामधून एकूण २० उमेदवार रिंगणात आहेत. आदित्य ठाकरेंबरोबरच या मतदारसंघातून बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेही निवडणूक लढवत आहे.