मराठा आरक्षणावरुन अजित पवार विरोधकांवर भडकले, दिले हे ‘उत्तर’

Ajit pawar

मुंबई :- हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. विरोधकांकडून सभागृहाच्या पायऱ्यांवर मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) गांभीर्याने न घेणाऱ्या सरकारचा धिक्कार असो अशा घोषणा देत आंदोलन करण्यात आले. यापार्श्वभूमीवर मराठा आरक्षणावरुन राज्य सरकारवर टीका करणाऱ्या विरोधकांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar)यांनी खडेबोल सुनावले आहे. राज्य सरकार मराठा आरक्षणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून आधीच्या काळात होते त्याच्यापेक्षा जास्त वकील दिले असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. आता जर कोणाला राजकारणच करायचे असेल आणि गैरसमज पसरवायचे असतील तर त्याला कोणी थांबवू शकत नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. ते प्रसार माध्यमांशी बोलत होते

मुख्यमंत्र्यांनी कालच्या पत्रकार परिषदेतच ओबीसीबद्दलचे प्रश्न असतील किंवा मराठा समाजासंबंधी आरक्षणाचे प्रश्न असतील, कोणालाही धक्का न लावता हे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. मराठा आरक्षणाचं प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. तारीख पुढे ढकलली आहे हे सर्वांना माहिती आहे. तारखेच्या वेळी चांगले वकील देण्याचं काम राज्य सरकार करत आहे, असे अजित पवारांनी सांगितले .

मराठा आरक्षणसंदर्भात योग्य भूमिका वकील मांडणार. त्यांनी त्यांच्या काळात जेवढे वकील ठेवले होते ते तसेच ठेवले, शिवाय त्यात अजून काही दिले. जास्त चांगल्या पद्दतीने प्रकरण मांडता यावं यासाठीच हे केलं. आता जर कोणाला राजकारणच करायचं असेल आणि गैरसमज पसरवायचे असतील तर त्याला कोणी थांबवू शकत नाही. पण आमची भूमिका स्पष्ट आहे. जसं आपल्या मुंबई हायकोर्टात ग्राह्य धरलं तसंच तिथं ते धरले जावं म्हणून आम्ही मोठ्या खंडपीठाकडे गेलो, अशी माहितीही अजित पवार यांनी दिली.

ही बातमी पण वाचा : ते जीन्स पँटचे चुकीचे झाले , पण…; अजित पवार यांचे सरकारी ड्रेसकोडवर भाष्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER