….कमतरता खपवून घेतली जाणार नाही : अजित पवार

Ajit Pawar

मुंबई :- राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचे संकट निर्माण झाले आहे. महाराज असते तर त्यांनीही लोकांचा जीव धोक्यात घालणारा निर्णय घेतला नसता. महाराजांनी घेतलेला प्रत्येक निर्णय जनतेचं हित आणि कल्याण लक्षात ठेवूनच घेण्यात आला होता असं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांनी म्हटले आहे. शिवनेरी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा (Shivneri Shivjayanti) जन्मसोहळा साजरा केला जात आहे. यावेळी अजित पवार बोलत होते.

कोरोना संकट पुन्हा एकदा डोकं वर काढू पाहत आहे. गेल्यावेळी असे कोणतंही संकट नव्हते . शिवजयंती उत्साहात साजरी करायची असते याबाबत कोणाचंही दुमत नाही. पण सध्या करोना संकट आणि खासकरुन विदर्भात अमरावती, यवतमाळ, अकोलामध्ये करोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत.

सार्वजनिक आरोग्यमंत्री, गृहमंत्री मागच्या काळात करोनाच्या वेळी घराघरात फिरलेले आपण पाहिले, पण यावेळी त्यांनाही करोनाची लागण झाली आहे. मास्क वापरला पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग ठेवले पाहिजे तसंच आपल्यासोबत इतरांचीही काळजी घ्यावी हेच सांगायचे तात्पर्य आहे,” असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले .

रयतेच्या जीवाला धोका निर्माण होईल असा कोणताही निर्णय महाराजांनी कदापी घेतलेला नाही. राज्यावर आज करोनाचं संकट आणि जनतेच्या जीवाला असणारा धोका लक्षात घेऊन गेल्या वर्षभरात सर्व सण, उत्सव मर्यादित स्वरुपात आपण साजरे केले. राज्यातील जनतेने देखील सर्व निर्णयांना पाठिंबा दिला म्हणून करोनावर नियंत्रण आणू शकलो, त्यामुळे सर्वांचे आभार मानतो, असे अजित पवारांनी सांगितले . शिवनेरीसाठी देण्यात येणारा २३ कोटी ५० लाखांचा निधी पोहोचला असल्याची माहिती यावेळी अजित पवारांनी दिली.

राज्यात पुन्हा एकदा करोना डोकं वर काढत असून अनेक ठिकाणी लॉकडाउन करण्यासंबंधी राज्य सरकार विचार करत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डिस्चार्ज मिळणाऱ्यांच्या तुलनेत करोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त असणं चिंतेची बाब असल्याचे टले आहे. यावेळी त्यांनी स्थानिक प्रशासनाला लॉकडाउनची मुभा देण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे.

ही बातमी पण वाचा : अजित पवार-हसन मुश्रीफ यांना बँक घोटाळा प्रकरणी क्लीन चिट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER