महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ७८ हजारांचा जवळ ; आतापर्यंत १२३ जणांचा मृत्यू

Coronavirus

मुंबई : देशभरासह राज्यातही कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . महाराष्ट्रात कोरोनाचे २९३३ नवे करोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या ७७ हजार ७९३ इतकी झाली आहे. आज १३५२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आत्तापर्यंत ३३ हजार ६८१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्याच्या घडीला ४१ हजार ३९३ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER