मंत्र्यांच्या फोन टॅपिंग प्रकरण ; आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना पोलिसांनी बोलावले चौकशीला!

Rashmi Shukla

मुंबई :- मत्र्यांचे फोन टॅप केल्याप्रकरणी (Phone Tapping Case) अखेर आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांना आता चौकशीसाठी महाराष्ट्र पोलिसांच्या (Maharashtra Police) सायबर सेलने समन्स (Maharashtra-cyber-cell-police-call-inquiry)बजावला आहे.

राज्याच्या माजी गुप्तचर विभागाच्या आयुक्त रश्मी शुक्ला यांचा अहवाल लीक झाला आणि राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमध्ये अस्थिरता निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. त्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी रश्मी शुक्लांवर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. आता या प्रकरणी रश्मी शुक्ला यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आला आहे.

एसआयडीमध्ये कार्यरत असताना काही मंत्र्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप रश्मी शुक्ला यांच्यावर करण्यात आला आहे.

रश्मी शुक्ला यांच्या हैदराबाद येथील निवासस्थानी हे समन्स धाडण्यात आले. उद्या म्हणजेच २८ एप्रिलला जबाब नोंदवण्यासाठी सायबर पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यास शुक्लांना सांगण्यात आले आहे. सायबर सेलचे तपास पथक दिल्लीलाही गेले असल्याची माहिती माहिती आहे.

श्मी शुक्ला सध्या केंद्रीय राखीव पोलीस दलात अतिरिक्त महासंचालक पदावर हैदराबाद येथे कार्यरत आहेत. फेब्रुवारी महिन्यापासून त्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button