महाराष्ट्राने ओलांडला मोठा टप्पा; एक कोटी नागरिकांचे लसीकरण : आरोग्य विभागाची माहिती

Maharashtra Coronavirus Vaccine

मुंबई : देशात कोरोना (Coronavirus) प्रतिबंधात्मक लसीकरणात (Coronavirus Vaccine) महाराष्ट्र सातत्याने प्रथम क्रमांकावर असून, आज (रविवार) राज्याने त्यात विक्रमी नोंद केली आहे. आतापर्यंत राज्यात १ कोटी ३८ हजार ४२१ जणांना लस देण्यात आली असून सायंकाळपर्यंत या आकडेवारीत आणखी वाढ होईल, अशी माहिती आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी दिली आहे. या विक्रमी कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी यंत्रणेचे कौतुक केले आहे.

तर, कोरोना संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असताना अनेक राज्यांमध्ये प्रशासन शिथिल झाल्याचे दिसत आहे असे सांगतानाच; कोरोनाचा फैलाव ‘युद्धपातळी’वर  रोखण्यासाठी पुढील दोन-तीन आठवडे ठामपणे प्रयत्न करावेत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी गुरुवारी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना केलेले आहे. जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी ११ ते १४ एप्रिल दरम्यान ‘लस महोत्सव’ आयोजित करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button