राज्यात बरे झालेल्या कोरोना रुग्णांचा विक्रमी उच्चांक, बाधितांचा आकडा ६० हजारांवर

Corona virus MAHARSHTRA

मुंबई : राज्यात आज दिवसभरात तब्बल 8 हजार 381 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. महाराष्ट्रासाठी ही दिलासादायक बाब आहे. त्यामुळे आतापर्यंत एकूण 26 हजार 997 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर राज्यात आज दिवसभरात 2 हजार 682 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या आता 62 हजार 228 वर पोहोचली आहे. तर आज दिवसभरात 116 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाबळींची संख्या 2 हजार 098 वर पोहोचली आहे.

राज्यात सध्या 33 हजार 124 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात आज 116 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे एकूण कोरोनाबळींची संख्या 2098 इतकी झाली आहे.

आज झालेल्या 116 मृत्यूपैकी मुंबईचे 38, नवी मुंबईतील 9, भिवंडीतील 3, रायगडमधील 2, पनवेलमधील 1, ठाण्यातील 1, कल्याण-डोंबिवलीतील 1, जळगावातील 17, नाशकातील 3, मालेगावातील 5, धुळ्यातील 7, सोलापूरचे 3, औरंगाबादचे 5, पुण्यातील 13, मीरा-भाईंदरमधील 3, कोल्हापुरातील 3 आणि अमरावतीतील दोघांचा समावेश आहे.

Check PDF:- राज्यात बरे झालेल्या कोरोना रुग्णांचा विक्रमी उच्चांक


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER