कोरोना : राज्यात ३३ नवे रुग्ण आढळले, एकूण संख्या ३३५

Maharashtra-corona-rajesh tope

मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या ३३ नव्या रुग्णांची नोंद झाली. यात ३० मुंबई, पुणे २ आणि बुलडाण्यातील एक आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा ३३५ झाला आहे. आज तीन रुग्णांचा मृत्यू झाला. यातील दोघे मुंबईचे – एक ७५ व दुसरा ५१ वर्षांचा आहे. दोघेही पुरुष. पालघर येथे एका रुग्णाचा मृत्यू झाला (पुरुष ५० वर्षे). या तिघांनीही परदेशात प्रवास केलेला नाही. राज्यात आतापर्यंत कोरोनाच्या एकूण १३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची आजची जिल्हा – मनपानिहाय संख्या; कंसातील आकडा मृतांचा

 • मुंबई – १८१ (९)
 • पुणे शहर व ग्रामीण – ५० (१)
 • सांगली – २५ (०)
 • मुंबई वगळून ठाणे मंडळातील इतर मनपा ३६ (२)
 • नागपूर १६ (०)
 • अहमदनगर ८ (०)
 • यवतमाळ ४ (०)
 • बुलडाणा ४ (१)
 • सातारा – कोल्हापूर २ (०)
 • औरंगाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, जळगाव, नाशिक, प्रत्येकी १ (०).
 • एकूण ३३५ (१३).

कोरोनाच्या ४१ रुग्णांना उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. राज्यात २४ हजार ८१८ संशयित रुग्ण घरगुती व १८२८ संस्थात्मक विलगीकरणात आहेत.