राज्यात कोरोनाचा उद्रेक, मागील २४ तासांत ५ हजार ४२७ करोनाबाधित आढळले

Maharashtra Coronavirus

मुंबई :- गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना (Corona) संक्रमित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार देखील आता कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं दिसत आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर पुन्हा लॉकडाउन देखील लागू केला जात आहे. राज्यात आज गेल्या महिन्याभरातील सर्वाधिक रुग्णवाढ झाली आहे. राज्यभरात मागील २४ तासांत ५ हजार ४२७ नवे करोनाबाधित वाढले असुन, ३८ रुग्णांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यावरून करोनाचे संकट हळूहळू पुन्हा गडद होतं की काय? अशी भीती सर्वसामान्यांच्या मनात निर्माण होऊ लागली आहे. राज्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता २० लाख ८१ हजार ५२० वर पोहचली आहे.

दरम्यान, मागील २४ तासांमध्ये २ हजार ५४३ जण करोनातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देखील मिळाला आहे. आतापर्यंत राज्यभरात १९ लाख ८७ हजार ८०४ जण करोनातून बरे झाले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९५.५ टक्के आहे. तर, ॲक्टिव्ह केसेसची संख्या ४० हजार ८५८ असून, आजपर्यंत करोनामुळे ५१ हजार ६६९ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे.

ही बातमी पण वाचा : अमरावती, यवतमाळ, अकोल्यात तातडीने कंटेन्मेंट झोन जाहीर करा; मुख्य सचिवांचे निर्देश

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER