महाराष्ट्र काँग्रेस सीएम रिलीफ फंडाला देणार ५ लाख रुपये; बाळासाहेब थोरात यांची माहिती

Balasaheb Thorat

मुंबई :- राज्यातील कोरोनाचे (Corona) वाढते संकट आणि लसीकरण खर्चाच्या पार्श्वभूमीवर सर्व काँग्रेस आमदारांनी मुख्यमंत्र्यांना मदत निधीसाठी १ महिन्याचे मानधन देण्याचे ठरवले आहे. तर मी सुद्धा १ वर्षाचे मानधन देणार… तसेच, महाराष्ट्र काँग्रेस सीएम रिलीफ फंडाला ५ लाख रुपये देईल (Maharashtra Congress to provide Rs 5 lakh to CM Relief Fund), अशी माहिती काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी दिली आहे.

बाळासाहेब थोरात यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “सर्वांचे लसीकरण मोफत झाले पाहिजे, यासाठी आम्ही आग्रही आहोत. यापूर्वीचे लसीकरणही मोफत झाले आहे. त्यामुळे मी माझे १ वर्षाचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहे. काँग्रेसचे सर्व आमदारही त्यांचे १ महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीला देणार आहेत. त्याचबरोबर, महाराष्ट्र (Maharashtra) काँग्रेसच्यावतीने मुख्यमंत्री सहायता निेधीला ५ लाख रुपये देणार आहेत. जे लोक आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत त्यांनी निधी देण्यासाठी पुढे यावे. त्यांनी ५ लोकांच्या लसीकरणाचा भार उचलावा, हे अभियान राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतिक पाटील यांनी सुरू केले आहे. ते स्वत: त्यांच्या आणि इतर ५ जणांच्या लसीकरणाचा खर्च उचलणार आहेत. हा एक स्तुत्य उपक्रम असून प्रत्येकाने प्रतीक पाटील यांचे अनुसरण करावे.” असे आवाहन बाळासाहेब थोरात यांनी केले.

कर्मचाऱ्यांचा खर्च उचलणार

मच्या अमृत उद्योगात एकूण ५ हजार कर्मचारी काम करतात. त्यांच्या लसीकरणाचा खर्चही आम्ही उचलणार आहोत. हा पैसा सीएम रिलीफ फंडात देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे, अशी माहिती थोरातांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button