निवडणुका आल्यानेच ‘लाचार’ वाघ जागा झाला; काँग्रेसची शिवसेनेवर मिस्कील टीका

maharashtra-congress-criticise-on-shivsena-crop-insurance-protest

मुंबई : शेतकऱ्यांना नडाल तर शिवसेना आपल्या स्टाइलने उत्तर देईल, असा इशारा देण्यासाठी पीक विमा कंपन्यांच्या विरोधात शिवसेनेकडून आज मुंबईत मोर्चा काढण्यात आला आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः मोर्च्याचे नेतृत्व करत आहेत. शिवसेनेच्या या भूमिकेवर कॉंग्रेसने ट्विटरच्या माध्यामातून मिस्कील टीका केली आहे. शिवसेनेला सत्तेच्या खुर्चीत असताना शेतकऱ्याची आठवण येत नाही; मात्र विधानसभेच्या निवडणुका येताच शेतकऱ्याच्या मुद्द्यांवर जाग येते.

महाराष्ट्रातील जनतेला मूर्ख बनवताना यांना लाज कशी वाटत नाही? असा घणाघात कॉंग्रेसकडून करण्यात आला आहे. शिवसेनेचा वाघ स्वाभिमानी नसून अतिशय लाचार आहे, अशी टीकाही करण्यात आली आहे.