कोरोनाच्या संकटात महाराष्ट्राला पुन्हा रक्तदानाची गरज; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हात जोडून केली विनंती

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढतच चालले आहे . परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकार करत असलेल्या उपाययोजनांबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी कोरोना आणि इतर आजारांशी लढणाऱ्या रुग्णांसाठी महाराष्ट्राला पुन्हा एकदा रक्तदानाची गरज असल्याचे म्हटले आहे.

यावेळी बोलत असताना उद्धव ठाकरेंनी हात जोडून जनतेला रक्तदान करण्याची विनंती केली. “कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात आपल्याला राज्यात रक्ताचा तुटवडा जाणवला होता. यानंतर आम्ही आवाहन केल्यानंतर त्याला राज्यातील जनतेने चांगला प्रतिसाद दिला. हा प्रतिसाद इतका चांगला होता की, आम्हाला आता रक्ताची गरज नाही, पुरेसा साठा आहे असे सांगावे लागले. मात्र गेल्या काही दिवसांत कोरोना आणि इतर आजारांमुळे रुग्णसंख्येत होत असलेली वाढ पाहता, राज्याला पुन्हा एकदा रक्तदानाची गरज आहे. त्यामुळे ज्या व्यक्तींना रक्तदान करणं शक्य आहे त्यांनी अवश्य रक्तदान करावे .” अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जनतेला विनंती केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER