मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शरद पवारांना बारामतीत भेटणार

Sharad Pawar And CM Uddhav Thackeray

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरुवारी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांना बारामतीला भेटणार आहेत. ही भेट गुरुवारी १६ जानेवारीला होणार आहे. अ‌ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने आयोजित केलेल्या कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. अ‌ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे संचालन पवार कुटुंबातर्फे केले जाते, हे येथे उल्लेखनीय.

आता नगरपरिषदेत एका सदस्याकडेच धाव घेणे सोपे!

मुख्य म्हणजे, मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा बारामतीतील हा पहिलाच कार्यक्रम आहे, हे विशेष. त्यामुळेच राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. महाविकास आघाडीचे उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच खासदार सुप्रिया सुळे हेदेखील यावेळी उपस्थित राहणार आहेत.

बारामतीतील शारदानगर येथील कृषी विज्ञान केंद्रातील या कृषी प्रदर्शनास गुरुवारी १६ जानेवारीपासून सुरूवात होत आहे. हे प्रदर्शन चार दिवस चालणार असून, अ‍ॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रमुख राजेंद्र पवार यांनी आज बुधवारी पत्रपरिषदेत याबाबत माहिती दिली. १६ जानेवारीला सकाळी ९ वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. कृषी मंत्री दादा भुसे, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, इस्रायलचे राजदूत डॅन अलुफ उदघाटनास उपस्थित राहतील, असे राजेंद्र पवार यांनी यावेळी सांगितले.