अंतिम परीक्षेसंदर्भात होणार निर्णय ; मुख्यमंत्र्यांची उद्या कुलगुरूंसोबत महत्त्वाची बैठक

CM Uddhav Thackeray

मुंबई :  देशात सुरू असलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शैक्षणिक क्षेत्राचे वेळापत्रक कोलमडले असून राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षांचा निर्णय लांबणीवर पडला आहे. काही दिवसांपूर्वी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमानुसार अंतिम वर्षाच्या आणि अंतिम सत्राच्या परीक्षा घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते . उर्वरित सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले .

मात्र, राज्यात कोरोना प्रसाराची भीती अजूनही कायम असून, परीक्षा घेण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. या परीक्षेसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी उद्या (३० मे) राज्यातील विद्यापीठांच्या कुलगुरूंची बैठक बोलावली आहे. विद्यापीठाच्या पदवी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी म्हटले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या स्थितीमध्ये राज्यातील असंख्य महाविद्यालये, विद्यापीठाच्या इमारती, वसतिगृह हे क्वारंटाईनसाठी दिलेली आहेत. त्यामुळे या इमारती वापरासाठी कधी खुल्या होतील, हे आताच सांगणे कठीण आहे. अशा स्थितीमध्ये परीक्षा घेणे कितपत शक्य होईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER