आज त्यांना आम्ही सोडणार नाही’; अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधकांचा आक्रमक पवित्रा

मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा (Maharashtra Budget 2021) आज शेवटचा दिवस आहे . मात्र शेवटच्या दिवशी विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले . मुंबई पोलिसांच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख सचिन वाझे यांनी आपल्या पतीचा खून केल्याचा संशय मनसुख हिरेन (Mansukh Hiren Death Case) यांच्या पत्नीने एटीएसला दिलेल्या जबाबात व्यक्त केला असल्याचा आरोप करत वाझे यांना तत्काळ निलंबित व अटक करण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली होती.

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया बंगल्यासमोर स्फोटकांसह सापडलेली स्कॉर्पिओ गाडी ज्यांची होती ते मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्याच्या खाडीमध्ये ५ मार्च रोजी सापडला होता. हिरेनची पत्नी विमला यांनी एटीएसला दिलेल्या जबाबाची प्रतच देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सभागृहात फडकवली. त्यामुळे सभागृह अवाक् झाले. वाझेंवर तत्काळ कारवाई करण्याच्या मागणीसाठी भाजपा सदस्य आक्रमक झाले. वाझे पूर्वी कोणत्या पक्षात होते? हिरेन यांचे शेवटचे मोबाइल लोकेशन सापडले ते धनंजय गावडे कोणत्या पक्षात आहेत? वाझेंबाबत पुरावे असताना त्यांना का पाठीशी घातले जात आहे? असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

सचिन वाझेंचे निलंबन आणि अटकेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) ठाम आहे. तसेच अधिवेशनापूर्वी सचिन वाझेंना आम्ही सोडणार नाही. त्यांच्याविरोधात विधान परिषदेत आज देखील आम्ही आवाज उठवणार, असा इशारा विरोधकांनी घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER