रडगाणं न गाता सर्व घटकांना दिलासा देणारा अर्थसंकल्प : उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray

मुंबई :- राज्यात एकीकडे कोरोनाचे संकट आहे. या आव्हानात्मक परिस्थितीत रडगाणं न गाता सर्व घटकांना दिलासा देणारा आणि राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प आम्ही मांडला आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार सत्तेत आल्यानंतर सरकारचा दुसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज सादर केला. कोरोना काळात राज्यातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. अशा स्थितीत जनतेला काय दिलासा मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अशातदेखील सरकारकडून विविध योजनांची घोषणा करण्यात आली आहे तसेच अनेक विभागांसाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची घोषणादेखील केली आहे.

या अर्थसंकल्पावर बोलताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले की, आपल्याला अपेक्षित येणं किती होतं आणि आलं किती? याची आकडेवारी सर्वांना माहिती आहे. अशा स्थितीत सर्व घटकांना दिलासा देत राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प सरकारनं मांडला आहे, असं ते म्हणाले. मुख्यमंत्री म्हणाले की, अर्थमंत्री आणि अर्थ राज्यमंत्री यांचे अभिनंदन करतो. कोरोना महामारीमुळं हे वर्ष आव्हानात्मक आहे. कोणतेही रडगाणे न गात जिद्दीने महाराष्ट्र थांबला नाही. थांबणार नाही, असं ते म्हणाले.

ते म्हणाले की, महिलांना आपल्या पायावर स्वाभिमानाने उभे करत आहोत. कृषी, शिक्षण, उद्योग या प्रत्येक क्षेत्राला गती देण्याचे काम केले, असं ते म्हणाले. राज्यातील जनतेचा, माता-भगिनींचा  आशीर्वाद आहे. त्याला धक्का लागू देणार नाही, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

ही बातमी पण वाचा : परिवहन क्षेत्रासाठी अजित पवारांची महत्त्वाची घोषणा!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER