अर्थसंकल्प मांडताना अजित पवार चुकले

Ajit Pawar

मुंबई :- अर्थसंकल्प सभागृहात सादर होत असताना सभागृहाचं चित्र आपोआपच गंभीर होत असते. सभागृहाला त्या गंभीरतेतून ब्रेक देण्यासाठी मग विषयाला अनुसरून मंत्र्यांकडून शेरो शायरींचा उल्लेख केला जातो. मात्र, आजचा अर्थसंकल्प मांडताना उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार य़ांच्याकडून चूक झाली आहे. अजित पवार यांनी हरिवंशराय बच्चन यांच्या कवितेतील ओळी असे म्हणत कोशीश करनेवालों की हार नही होती… या कवितेतील दोन ओळी वाचून दाखवल्या.

अर्थसंकल्पातही ‘पुणे तिथे काय उणे’, अजित पवारांकडून घोषणांचा पाऊस

असफलता एक चुनौती है, स्वीकार करो ! क्या कमी रह गई, देखो और सुधार करो !! असे म्हणत अजित पवार यांनी अनेक संकटांचा सामना करत आणि आव्हानं स्वीकारत राज्याला पुढील वाटचाल करावी लागणार आहे असे सूचवले. कविता हरिवंशराय बच्चन यांची असल्याचं सांगणं ही अजित पवारांची चूक होती. कारण, स्वत: अमिताभ बच्चन यांनीच याबाबत खुलासा केला आहे. अमिताभ यांनी 6 मे 2018 साली ट्विट करुन ही कविता हरिवंशराय बच्चन यांची नसून याचे कवि/रचनाकार सोहनलाल द्विवेदी आहेत, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे, अजित पवार यांनी कवितेतील दोन ओळींचा उल्लेख करताना हरिवंशराय बच्चन असे म्हणणं ही चुकीचे ठरले आहे.


Web Title : Ajit Pawar missed out on budget proposal

(Maharashtra Today : Latest and breaking marathi news from Mumbai City, Nagpur City, Thane City, Pune City, Aurangabad City, Kolhapur City, Sangli City, Ratnagiri City, Nanded City and all other cities of Maharashtra.)