
मुंबई :- भगवद्गीता पठण स्पर्धेच्या धर्तीवर शिवसेनेच्या (Shiv Sena) वतीने आता अजान पठण स्पर्धा घेण्यात येणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे पदाधिकारी पांडुरंग सकपाळ यांनी दिली होती. यापार्श्वभूमीवर विरोधकांनी शिवसेनेवर निशाणा साधण्यास सुरुवात केली .
महाराष्ट्रातील भाजपा नेते ‘अजान’वरून राजकारण करत आहेत. करोना काळात धार्मिकस्थळांवर गर्दी होऊ नये, असे पंतप्रधानांनी देखील सांगितले आहे. शिवसेनेने हिंदुत्व सोडलं असे जे म्हणत आहेत, त्यांनी हा तमाशा बंद करावा. बेरोजगारी, जीडीपी इत्यादी मुद्यांवर त्यांनी बोलायला हवं, असे शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटले आहे.
दरम्यान शिवसेनेने ‘अजान’प्रकरणी हिंदुत्वास सोडचिठ्ठी दिल्याचे जे दात उचकटून बोलत आहेत त्यांच्या दाताडांत ‘ईद’च्या शिरकुरम्याची, बिर्याणीची शिते अडकल्याची साग्रसंगीत छायाचित्रेच प्रसिद्ध झाली आहेत. शिवसेनेच्या हिंदुत्वाकडे बोट दाखवताना चार बोटे स्वतःकडेही वळली आहेत याचे भान राखा. स्वतः मतांच्या लांगूलचालनासाठी बांग द्यायची व दुसऱ्यांच्या अजानवर आक्षेप घ्यायचा, असा आरोप शिवसेनेने केला आहे. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून भाजपावर निशाणा साधला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला