ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

Asha Bhoslae - Maharastra Today

मुंबई :- जेष्ठ गायिका आशा भोसले यांना २०२० या वर्षीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मागील अनेक दिवसांपासून महाराष्ट्र भूषण पुरस्कार नेमका कुणाला दिलाजाणार याबाबत चर्चा सुरूहोती. अखेर आज आशा भोसले (Asha Bhosle) यांना हा पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आले.

आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीस समितीचे उपाध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh), राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, सांस्कृतिक कार्य सचिव सौरभ विजय आणि सदस्य सचिव सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे हे शासकीय सदस्य तसेच अशासकीय सदस्य सहभागी झाले होते. हा पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आशाताईंचे अभिनंदन केले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER