‘एनआरसी, सीएए विरोध ; वंचित आघाडीकडून आज महाराष्ट्र बंदची हाक

ठाण्यात कार्यकर्त्यांचे रस्तावर झोपून आंदोलन

maharashtra-bandh-called-by-Prakash Ambedkar vba-against-caa nrc

मुंबई: नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि देशातील ढासळलेल्या अर्थव्यवस्थेच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने आज ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे. याबाबत बोलताना बहुजन वंचित आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर म्हणाले, ‘एनआरसी, सीएएविरोधात विरोधक राजकीय पक्षांनी बंदला पाठींबा द्यायला हवा, दुर्दैवाने दिला जात नाही. देशात आर्थिक परिस्थिती मोठ्या प्रमाणात घसरत आहे. त्यामुळे देशाचं नाक कापायला नको’, असे म्हणत त्यांनी सामान्य जनतेला बंदला पाठींबा देण्याचे आणि सहभागी होण्याचे आवाहन केले.

आजच्या बंदमध्ये तब्बल 50 संघटना सहभागी होणार असून आमदार कपिल पाटील यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे आजच्या बंदच्या पार्श्‍वभूमीवर शाळा बंद ठेवण्याची मागणी केली आहे. याबाबतचे पत्र पाटील यांनी शिक्षणमंत्र्यांना दिले आहे.

  • – ठाण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांकडून रस्त्यावर झोपून आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
  • -वंचित बहुजन आघाडीतर्फे असल्फा घाटकोपर येथे पहाटे बेस्टची बस थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. घाटकोपरच्या कार्यकर्त्यांनी बस अडवली होती मात्र आता वाहतूक सुरळीत सुरू आहे.
  • -वंचितकडून महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला असून मनमाडमध्ये या बंदला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शहरातील प्रमुख बाजर पेठ, शाळा बस, रिक्षा सुरु असून इतर सर्व दुकानं बंद आहेत.
  • – ‘एनआरसी, सीएए आणि आर्थिक धोरणामुळे व्यापार संपला, बेरोजगारी वाढली याच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदसाठी बंचितचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. ठाण्यातील तीन हात नाका येथे कार्यकर्ते सरकारविरोधात घोषणा देत आहेत.
  • -वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आज पुकारलेल्या बंदला मुक्ताईनगरात प्रतिसाद दिसत आहे. सकाळपासून येथील सर्व दुकानं बंद आहेत. तसेच बस आणि इतर वाहतूक सेवा सुरु आहे.

इंदू मिलची पाहणी हे पवारांचे मतांचे राजकारण – प्रकाश आंबेडकर