काँग्रेसला धक्का ; पृथ्वीराज चव्हाणांचे निकटवर्तीय आमदार आनंदराव पाटील भाजपच्या वाटेवर

Congress MLA Anandrao Patil

मुंबई :- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे वाहू लागले आहे. आतापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी भाजप-शिवसेनेत प्रवेश केला. अद्यापही काँग्रेसची गळती सुरूच आहे. यातच आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचे निकटवर्तीय मानले जाणारे काँग्रेसचे आमदार आनंदराव पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय गोटात सुरू झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतल्यानंतर पाटील यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

ही बातमी पण वाचा : नागपूर बोले तो; भाजपचा माजी आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर

येत्या 13 सप्टेंबर रोजी विजयनगर येथे भव्य मेळावा घेऊन आनंदराव पाटील आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं म्हटलं जात आहे. आनंदराव पाटील यांनी जर भाजपमध्ये प्रवेश केला तर पश्चिम महाराष्ट्रात आणखी मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इतकेच नाही तर पृथ्वीराज चव्हाण यांची कराड विधानसभा मतदारसंघात मोठी राजकीय कोंडी होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे .

दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी विधानसभेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच आताही कॉंग्रेस आणि भाजपचे अनेक नेते भाजप आणि सेनेच्या वाटेवर आहेत. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अडचणी वाढणार आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप –सेना युतीची ताकद वाढत आहे. तर काँग्रेस -राष्ट्रवादी कमकुवत होताना दिसत आहे.