महाराष्ट्र : नव्या काँग्रेस प्रदेशाध्यक्षाच्या निवडीच्या हालचालींना वेग

Congress

मुंबई : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये (Congress) खांदेपालटाचे वारे वाहात आहेत. मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्याकडे असलेले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपद नव्याला  देण्याचे ठरले आहे. यासंदर्भात आज महाराष्ट्राचे प्रभारी मुंबईत महाराष्ट्राच्या तीन माजी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार आहेत. महाराष्ट्राचा नवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कोण? याचे उत्तर आज संध्याकाळी कदाचित मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. (Maharashtra New Congress President, Today Important meeting in Mumbai) ही बैठक महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच. के. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सांयकाळी साडेसहा वाजता मुंबईत होणार आहे.

ही बैठक माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan), पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan), सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांच्यासोबत होणार आहे. याबाबत थोरात म्हणालेत, मंत्रिपदासह माझ्यावर तीन महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे मीच पक्षश्रेष्ठींकडे प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची इच्छा व्यक्त केली. तरुण नेत्याला संधी द्या, आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू, असे सांगितले. प्रदेशाध्यक्षपदासाठी कोणता चेहरा असेल हे सांगू शकत नाही.

प्रभारींबाबत नाराजी नाही- थोरात

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्यावर बाळासाहेब थोरात नाराज आहेत. त्या नाराजीतूनच बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे. याचे खंडन करताना थोरात म्हणालेत की, एच. के. पाटील यांच्याविरोधात काहीही नाराजी नाही. माझ्यावरही कुणी नाराज नाही.

यांची चर्चा

नव्या प्रदेशाध्यक्षासाठी सध्या सुनील केदार (Sunil Kedar), विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar), यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांची नावे चर्चेत आहेत. त्याशिवाय नाना पटोले, राजीव सातव आणि पृथ्वीराज चव्हाण या राष्ट्रीय स्तरावरील राज्यातील नेत्यांच्या नावाचा विचार होण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER