राज्यात कोरोनाचे ७ हजार ९७५ नवे रुग्ण, तर २३३ रुग्णांचा मृत्यू

मुंबई : देशातील कोरोनाबाधितांची (Corona Virus) संख्या सातत्याने वाढतच चालली आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने गुरुवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, बुधवारी सकाळी ८ वाजल्यापासून ते गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंत राज्यात गेल्या आठ दिवसात तब्बल ५८ हजार ५१९ नव्या रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ७५ हजार ६४० वर पोहोचली आहे. आज दिवसभरात (१५ जुलै) राज्यात ७ हजार ९७५ कोरोनाबाधित रुग्ण (Corona patients) आढळले आहेत.

तर देशभरात ३२ हजार ६९५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर तब्बल ६०६ जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. देशभरात गेल्या२४तासांत तब्बल २०,७८३ लोकांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. सध्या देशात तब्बल ३ लाख ३१ हजार १४६ एकवढे रुग्ण सक्रिय आहेत. आतापर्यंत एकूण ६ लाख १२ हजार ८१४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर २४ हजार ९१५ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. आतापर्यंत देशात एकूण ९,६८,८१४ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

तर राज्यात राज्यात दिवसभरात ३ हजार ६०६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. राज्यात आतापर्यंत १ लाख ५२ हजार ६१३ रुग्ण बरे झाले आहेत. तर १ लाख ११ हजार ८०१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ५५.६७ टक्क्यांवर पोहोचलं आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली.

Check PDF

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER