महंत नृत्यगोपाल दास महाराज यांना कोरोनाची लागण

Mahant Nritya Gopal Das Maharaj Tested corona Positive

अयोध्या :- अयोध्येतील रामजन्मभूमी ट्रस्टचे प्रमुख महंत नृत्यगोपाल दास (Nritya Gopal Das) महाराज यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा रिपोर्ट कोरोना ‘पॉझिटिव्ह’ आला आहे. गेल्या आठवड्यात अयोध्येत झालेल्या राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला महंत नृत्यगोपाल दास हजर होते. त्यावेळी अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) त्यांच्या संपर्कात आले होते. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी महंत नृत्यगोपाल दास यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

कोरोनाच्या (Corona) साथीमुळे ५ ऑगस्ट रोजी अयोध्येतील राम मंदिर (Ram Mandir) भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी ठरावीक लोकांनाच निमंत्रण देण्यात आले होते. मंचावर फक्त पाच लोकांनाच परवानगी होती. यामध्ये महंत नृत्यगोपाल दास यांचा समावेश होता. त्यांच्यासोबत मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील हजर होते. नरेंद्र मोदी अनेकदा महंत नृत्यगोपाल दास यांच्याजवळ गेले होते.

या कार्यक्रमात मंचावर महंत नृत्यगोपाल दास आणि नरेंद्र मोदी यांच्यासह उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक  मोहन भागवत आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल उपस्थित होत्या.

योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी स्थानिक प्रशासन तसेच मेदांता रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क करून महंत नृत्यगोपाल दास यांच्या उपचाराकडे लक्ष देण्याची विंनती केली, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून देण्यात आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER