…म्हणून संकटातही महाकुंभचे भव्यदिव्य आयोजन करावे- तिरथ सिंह रावत

नवी दिल्ली : उत्तराखंडचे मुख्यमंत्री तिरथ सिंह रावत (Tirath Singh Rawat) यांच्यावर काही दिवसांपूर्वी फाटक्या जीन्सबाबत टीका होत होती. महिला वापरत असलेल्या जीन्सवर विधान केल्याने वाद निर्माण झाला होता. या विधानामुळे रावत खूप चर्चेत होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा रावत चर्चेत आहेत. वाराणसीत कुंभमेळा होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. कोरोना काळात महाकुंभचे (Mahakumbh) आयोजन करणे गरजेचे आहे, असे मत तिरथ सिंग रावत यांनी व्यक्त केले आहे.

तिरथ सिंह रावत यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती. मात्र, आता ते पूर्णपणे बरे आहेत. सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमांना उपस्थिती लावत आहेत. याच दरम्यान त्यांनी “महाकुंभ १२ वर्षांतून एकदा येतो, दरवर्षी येत नाही. जत्रा दरवर्षी होतात आणि कुठेही होऊ शकतात. मात्र, हरिद्वार, वाराणसी आणि उज्जैनमध्येच महाकुंभ होतो. त्यामुळेच महाकुंभचे भव्यदिव्य आयोजन करण्यात आले पाहिजे.” असे मत रावत यांनी व्यक्त केले आहे. कुंभमेळा हा हरिद्वार, उज्जैन, प्रयागराज आणि नाशिकमध्ये होतो. मात्र, रावत यांनी यावेळी वाराणसीमध्ये होत असल्याचे सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button