महाजन बायकांचे आणि पोरींचेच फोन उचलतो; एकनाथ खडसेंचे वादग्रस्त विधान

Eknath Khadse - Girish Mahajan - Maharastra Today

मुंबई : जळगावच्या राजकारणात एकमेकांचे कट्टर वैरीअसलेले एकनाथ खडसे (Eknath Khadse) आणि गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यातील वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे. एकनाथ खडसे यांच्या दूरध्वनीवरील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये जामनेरमधील एक ग्रामस्थ पाणी नसल्याची तक्रार एकनाथ खडसे यांना करताना ऐकू येत आहे. त्यावर एकनाथ खडसे यांनी मग तुमचा आमदार गिरीश मेला का? असे वक्तव्य केले.

जामनेरच्या वाकोदजवळ असलेल्या वडगाव बुद्रूक गावातील एका ग्रामस्थाने एकनाथ खडसे यांना फोन केला होता. त्याने आपल्या गावात पाणी नसल्याची तक्रार केली. त्यावर एकनाथ खडसे यांनी तुमचा आमदार गिरीश इकडे-तिकडे बायकांच्यामागे फिरतोय का? असे म्हटले.

त्यावर गावकऱ्याने गिरीश महाजन आपला फोन उचलत नसल्याचे सांगितले. तेव्हा एकनाथ खडसे यांनी, तो (गिरीश महाजन) फक्त पोरींचेच फोन उचलतो, असे म्हटले. तसेच आपल्या मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवायचे सोडून गिरीश महाजन पश्चिम बंगालमध्ये काय फिरत बसलेत, अशी टिप्पणीही एकनाथ खडसे यांनी केली.

याशिवाय, एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्याविषयी अनेक आक्षेपार्ह विधाने केली आहेत. ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर प्रसारमाध्यमांच्या काही प्रतिनिधींनी त्यांच्याशी संपर्कही साधला. तेव्हा एकनाथ खडसे यांनी तो आवाज आपलाच असल्याची कबुली दिली. खानदेशी भाषेत आपण ‘ अमका तमका मेला का?’ असे सहज म्हणून जातो. ही बोलीभाषा आहे. त्यामुळे यामध्ये काही विशेष नाही, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले. यात एकनाथ खडसे यांचा दोष नाही. वाढते वय, अनेक आजार यामुळे त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. राष्ट्रवादीत जाऊन त्यांना आमदारकी मिळाली नाही. त्यांच्या मुलीलाही लोकांनी नाकारले. त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती बिघडल्याची टीका गिरीश महाजन यांनी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button