महाडिक आणि जाधव यांच्याकडे महापालिकेची भाजपची धुरा

Mahesh Jadhav - Dhananjay Mahadik

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या (Kolhapur Municipal Corporation) निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने माजी खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) व पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव (Mahesh Jadhav) यांची समिती नियुक्त केली आहे. भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी या समितीची घोषणा केली आहे.

महापालिका निवडणुकीसंदर्भात ही समिती निर्णय घेईल. याशिवाय या दोघांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी निवडणूक संचालन समिती स्थापण्यात येणार आहे. निवडणूक संचालन समितीची घोषणा येत्या दोन दिवसात होणार आहे.

भारतीय जनता पक्ष आणि ताराराणी आघाडीतर्फे महापालिकेची निवडणूक लढविली जाणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक यांनी नुकतेच भाजप, ताराराणी आघाडीच्या नगरसेवकांची तसेच भाजप आघाडीमार्फत लढणाऱ्या इच्छुकांची मते जाणून घेतली आहेत. भाजप, ताराराणी आघाडीला गेल्या निवडणुकीत ३३ जागा मिळाल्या होत्या. गेल्यावेळी डोळयादेखल महापालिकेतील सत्ता दूर गेल्याचे शल्य आजही भाजप आघाडीच्या नेत्यांच्या मनी आहे. आगामी महापालिका निवडणूक ताकतीनिशी लढविण्याचे भाजप, ताराराणी आघाडीने ठरविले आहे. त्या तयारीचा एक भाग म्हणून निवडणुकीसाठी माजी खासदार महाडिक व देवस्थान समितीचे अध्यक्ष जाधव यांच्या समितीची घोषणा केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER