गोपीनाथरावांच्या जाण्यानं मोठे नुकसान झाले, सत्तेचे विभाजन झाले नसते – महादेव जानकर

परळी : भाजप (BJP) नेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त रासप नेते महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी बीडमधील परळी येथे गोपीनाथ गडावर हजेरी लावली. गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन केल्यानंतर जानकर खूपच भावुक झाल्याचे दिसून आले. बापाचं छत्र गेल्यानंतर मुलगा अनाथ होतो, तसा मी झालो, अशा भावना जानकरांनी यावेळी व्यक्त केल्या.

गोपीनाथराव हे सामान्य माणसाला घडवणारे खरे महानायक होते. मी पंकजा मुंडे यांच्या सुखाऐवजी दुःखात जास्त सहभागी आहे. बापाचं छत्र गेल्यानंतर मुलगा अनाथ होतो. तसा मीपण अनाथ झालो. मुंडे साहेब आज असते, तर सत्तेच विभाजन झालं नसतं. त्याची जाणीव पदोपदी येते मुंडे साहेब बापमाणूस होते, गोपीनाथराव नसल्याने सत्ता गेली. मात्र मी आजही एनडीए सोबत आहे, असं महादेव जानकर म्हणाले.

गोपीनाथ मुंडे आज असते तर महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळी परिस्थिती बघायला मिळाली असती. गोपीनाथ मुंडेंच्या जाण्यानंतर मी पंकजा मुंडेंच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. येत्या काळात ओबीसींचं नेतृत्व हे पंकजा मुंडेंनी करावं आणि त्यासाठी पंकजा मुंडे प्रयत्न करत आहेत. ओबीसींच्या कोट्यातून इतर कोणालाही आरक्षण देता कामा नये. राज्यात ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. ओबीसींनी या राज्याची सत्ता हाती घ्यावी, सत्तेत ओबीसी असल्याशिवाय ओबीसींचे प्रश्न निकाली निघणार नाहीत. ओबीसींनी सत्तेत यावे, ही आमची भूमिका आहे, सगळ्या जातींना आरक्षण मिळावं ही आमची भूमिका आहे, मात्र ओबीसींच्या आरक्षणाला हात लागता कामा नये, अशी संतप्त प्रतिक्रिया जानकरांनी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button