महादेव जानकर पवारांच्या बारामतीतून लोकसभा लढण्याची शक्यता

बारामती : महाराष्ट्राभर फिरुन येऊन मी बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha constituency) मुक्कामासाठी येणार आहो. बारामतीच्या सर्व जाती-धर्माच्या लोकांनी मला खूप भरभरून प्रेम केले आहे. त्यामुळे मी बारामतीकरांना वाऱ्यावर सोडणार नाही. बारामतीत लक्ष घालून मी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहून पुढील रणनीती आखण्यासाठी माझे हे दौरे आहेत. असं सांगत माजी मंत्री आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर (Mahadev Jankar) यांनी बारामतीतून पुन्हा निवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.

राज्याचे माजी पशुसंवर्धन, दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर हे मागील तीन दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघात आपल्या राष्ट्रीय समाज पक्षाची मोर्चेबांधणी करत आहेत. जुन्या मित्रांना भेटून त्यांच्यात मिसळून सायकलिंग करणे, पोहणे, रानावनात मुक्काम करत ते लोकांचे प्रश्न समजून घेत आहेत. येत्या दोन महिन्यात महाविकास आघाडी सरकार पडेल या भाजपच्या दाव्यावर महादेव जानकर यांनी प्रतिक्रिया दिली. माझे केवळ दोन आमदार आहेत. त्यामुळे ज्यावेळेस आमदार वाढतील, तेव्हा त्या विषयावर बोलणे योग्य होईल. भाजप हा आमचा मोठा भाऊ आहे. ते जर असे म्हणत असतील, तर सरकार पडले तर उत्तम होईल असेही महादेव जानकर म्हणाले. राज्य सरकार आपल्या घोषणेवरुन मागे फिरत आहे.

अधिवेशन संपेपर्यंत वीज खनदीत करणार नाही यावर सरकारने होकार दिला आणि अधिवेशन संपताच वीज तोडणी सुरू केली, हे योग्य नाही. आघाडी सरकार देखील शेतकऱ्यांची हिताचे आहे, मात्र आघाडी सरकारच्या मंत्र्यांना त्यांनी विनंती करत शेतकऱ्यांची वीज पूर्ववत करावी, अन्यथा राष्ट्रीय समाज पक्ष मोठे आंदोलन उभारेल, असा इशाराही त्यांनी दिला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER